सातारा : नाट्य परिषदेची सातारा केंद्रावरील एकांकिका स्पर्धा 2026 कला व वाणिज्य महाविद्यालयात पार पडली. यावेळी साताऱ्यातील संघांनी आणि प्रेक्षकांनी आपली उपस्थिती लावली. स्पर्धा सुरू होण्याआधी सातारच्या जमलेल्या सर्व रंगकामींनी व मान्यवरांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना जयेंद्र चव्हाण म्हणाले की नाना पाटेकर हे जसे उत्तम अभिनेते होते तसेच त्यांचं समाजकार्य सुद्धा वाखाणण्याजोग होतं. त्यांच्या अभिनयाची आणि समाजकार्याची दखल नेहमी घेतली जाईल असं मत व्यक्त केलं. तर मराठीचा दादा अभिनेता हरपला आणि ही पोकळी भरून न निघणारी आहे. अगदी मराठी नाटक सिनेमा असो की हिंदी सिनेमा असो नाना पाटेकरांनी आपले पाय भक्कम रोवले होते. हिंदीतल्या व्यवसायिक सिनेमात ज्या प्रभावीपणे त्यांनी आपली वेगवेगळी पात्र साकारली ती खरंच लाजवाबच होती आणि मराठी नाटक आणि सिनेमातली त्यांची हटके आणि वेगळी पात्रं त्यांनी एका गंभीर आणि वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ठरली.
वेलकम, अबतक छपन्न, अंकुश, नटसम्राट, पुरुष या आणि अशाच काही अजरामर कलाकृती त्यांनी अभिनित केल्या. प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम होतं आणि सदैव राहील असं मत अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.
यावेळी अमित बैचे, महेंद्र तेरेदेसाई हे परिक्षक तसेच राजीव मुळ्ये, संतोष पाटील, आनंद कदम, निलेश माने, कुलदीप मोहिते, अमित देशमुख, जमीर आतार, शशांक वाडेकर, संतोष वेल्हाळ, धनश्री भीडे, प्रज्ञा चव्हाण, धैर्यशील उत्तेकर, हेमंत खळतकर, चैतन्य पाटेकर, अशोक शेलार, महेश चव्हाण, देवांग सपकाळ आदी रंगकर्मी उपस्थित होते
मराठीचा दादा अभिनेता हरपला - जयेंद्र चव्हाण, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सातारच्या रंगकर्मींच्या वतीने श्रद्धांजली
by Team Satara Today | published on : 12 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा