सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे २४ ते २७ ऑक्टोबर कालावधीत माजी सैनिक, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती रॅलीचे आयोजन

by Team Satara Today | published on : 12 October 2026


सातारा  : १३६ ईसीओ (टीए) महार तर्फे सशस्त्र दलातून निवृत्त झालेले पेन्शनधारक माजी सैनिक आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF & CC) तसेच राज्य वन विभागात किमान २० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.                              ही भरती रॅली २४ ऑक्टोबर  ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी पाच वाजता सैनिक स्कूल ग्राउंड, सातारा येथे पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सहभागी होणाऱ्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही किमान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही, मात्र संबंधित उमेदवारांनी आपल्या सेवामुक्ती किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेपासून ५ वर्षांच्या आत या भरती प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत अनिवार्य आहे.
भरती प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या मापदंडांनुसार उमेदवारांची वैद्यकीय वर्गवारी मेड कॅट शेप १ असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे चारित्र्य अनुकरणीय किंवा अतिशय चांगले असणे गरजेचे असून उमेदवार कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणात सामील नसणे बंधनकारक आहे. रॅलीला येताना उमेदवारांनी पीपीओची मूळ प्रत, डिस्चार्ज बुक, सैनिक ओळखपत्र, रहिवासी दाखला (डोमिसाईल), ओळखपत्रासाठी आधार कार्ड आणि अलीकडील १० रंगीत पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांची शारीरिक चाचणी डायरेक्टोरेट जनरल टेरिटोरियल आर्मीच्या अधिकृत निर्देशांनुसार घेतली जाणार आहे, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘आयएनटी’च्या हिंदी विभागात सातारचे लेखक राजीव मुळ्ये सर्वोत्कृष्ट लेखक; ‘माइंड युवर स्पेस’ एकांकिकेस द्वितीय क्रमांक
पुढील बातमी
जलसेवा संकल्प अभियानांतर्गत वडूज, काळेवाडी व कोरेगाव येथे उपक्रम; पाणी बचतीसाठी पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून सिंचनाचे नियोजन करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या