फलटण तालुक्यात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; तामखडा येथील दुर्दैवी घटना

by Team Satara Today | published on : 12 October 2026


फलटण : पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियांका अजय जाधव (रा. तामखडा, ता. फलटण) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालकाविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तामखडा गावातील पवारवाडी परिसरात रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी अजय महादेव जाधव (वय ३३) हे पत्नी प्रियांका जाधव यांच्यासह दुचाकीवरून (क्रमांक एमएच ११, सीएस ५५७६) जात होते. रस्त्यावरील कामाच्या परिस्थितीमुळे दुचाकीचा तोल जाऊन ती रस्त्याच्या कडेला गेली असता, पाठीमागून वेगाने आलेल्या पाण्याच्या टँकरने (क्रमांक एमएच ११, एम ४८२९) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रियांका जाधव यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमपीएससी आंदोलनाला मोठे यश, मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची मोठी घोषणा, प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती
पुढील बातमी
मालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार; आईसह चुलता गंभीर जखमी

संबंधित बातम्या