सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा-कोरेगाव रस्त्यावर एका रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या इको कार (क्र. एमएच 11 डीएन 5587) वरील चालकाने धडक दिल्याने रिक्षा मधील सुरज राजेंद्र सूर्यवंशी रा. संगम माहुली, पोस्ट क्षेत्रमाहुली, ता. सातारा हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालक तेजस मुकुंद पाठक (पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवतेश्वरच्या दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या