सेवा संकल्प अभियानाअंतर्गत लोणंद येथे नव चेतना बाल मेळावा उत्साहात; महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनबाबत सविस्तर माहिती

by Team Satara Today | published on : 11 October 2026


​सातारा  : ​महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व महिला व बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना  बाल विकास नागरी प्रकल्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बीट-लोणंद येथे नव चेतना बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
​या मेळाव्यात महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्रामार्फत हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व तात्पुरत्या राहण्याची सोय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१, चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० या टोल फ्री क्रमांकांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
​या प्रसंगी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र आणि बालविवाह प्रतिबंध कायदा या विविध विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम झाले पाहिजे असे आवाहन करण्यात आले. ​या कार्यक्रमास महिला सक्षमीकरण केंद्र विभागातील मृण्मयी जाधव, सोनाली देसाई, तनया घोरपडे , मानसी शिर्के, अंगणवाडी बीट, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रपतींनी भेटल्यानंतर इंडिया आघाडीचे नेते सरन्यायाधीशांची घेणार भेट; ज्ञानेश कुमार यांच्याराजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक
पुढील बातमी
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत काळोशी येथे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम

संबंधित बातम्या