सलग वाहणारा कास धरणाचा सांडवा यंदा दीड महिना अगोदरच थांबला; भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 11 October 2026


कास : एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी; परिणामी दीड महिना अगोदरच सलग वाहणारा कासचा सांडवा थांबला. गतवर्षी सलग ११८ दिवस वाहणारा सांडवा यंदा ७१ दिवसच वाहले. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास तसेच पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कास परिसरातील अधूनमधून पावसाची संततधार गेली सव्वादोन महिने १५ सप्टेंबरपर्यंत सलग ओव्हरफ्लो झालेले कास धरण यंदा जुलै महिन्यात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन कास धरण ६ जुलैला ओव्हरफ्लो झाले होते. ६ जुलैपासून १५ सप्टेंबरपर्यंत सलग सव्वादोन महिन्यांपासून कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच होते.
एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. यंदा कास परिसरातही नेहमीसारखा पाऊस पडला नाही. परिणामी यामुळे कास पठारावरील फुलांनाही याचा फटका बसला तसेच गतवर्षी चार महिने वाहणारा कासचा सांडवा यंदा सव्वादोन महिनेच वाहिल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवू शकते. यापुढे पावसाचे गणित बिघडल्यास पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावून भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंदोलनासाठी शांतपणे एकत्र येणाऱ्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
पुढील बातमी
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेटा, आंदोलनाबाबत ठोस निर्णय घ्या; रोहित पवार आक्रमक, अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम

संबंधित बातम्या