सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपले पूर्ण ताकद व अस्तित्व दाखवून देईल, असा ठाम विश्वास पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा बँकेत भारतीय जनता पक्षाची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्याचा दावा करत, बँकेच्या राजकारणात आपल्या पक्षाला हेतुपुरस्सर विचारात घेतले जात नसल्याचे शिंदे यांनी नमूद केले. जिल्हा बँकेत मूळ उद्देश बाजूला पडून राजकीय सत्तासंघर्षाला वाव मिळू नये अशी सुरुवातीपासूनची भूमिका असतानाही चर्चेतून बाजूला ठेवले जात असल्याने, पक्षाची भूमिका ठळकपणे मांडण्यासाठी आपण स्वतः दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात राज्य तसेच देशाच्या राजकारणात मोठे राजकीय बदल घडतील असा विश्वास व्यक्त करतानाच, सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
by Team Satara Today | published on : 11 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा