सातारा : किरकोळ वादातून सातारा तालुक्यातील एका गावात एका महिलेसह तिच्या दोन नातेवाइकांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. या वेळी संबंधित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार एका महिलेसह ऋषभ राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटील (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपअधीक्षक विपुल पाटील तपास करत आहेत.
सातारा तालुक्यातील एका गावात महिलेला जातीवाचक शिवीगाळ; तिघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा