आता प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा; सर्वसामान्यांच्या व्यथा या सरकारला कळत नाहीत

by Team Satara Today | published on : 10 October 2026


पुणे : साधी स्कॉलरशिपची परीक्षा यांना घेता येत नाही हे दुर्दैव आहे. या आंदोलन काळात तुम्ही आ. रोहित पवार यांच्यासोबत लढा देत आहात. सर्वसामान्यांच्या व्यथा या सरकारला कळत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात आंदोलनाची व्यापकता वाढवून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करावे लागेल, असा इशारा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिला.
दानवे म्हणाले की, एमपीएससीच्या अध्यक्षांना घरी पाठवले पाहिजे. अन्यायाचा कहर झाला गप्प किती बसणार. उचल तरुणा तलवार... विचाराची तलवार. दुर्गा उत्सवात येथे बसलेल्या दुर्गा राक्षसांचे निर्दालन करतील. पोलिसांनाही विनंती आहे, तुमची पोरं देखील अभ्यास करत आहेत. तुम्ही आम्ही एक आहोत. तेव्हा सरकार सांगितले म्हणून दिल्ली पोलिसांसारखे वागू नका.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, पोलिसांची एफआयआर हातात पडली. त्यात खूप हास्यास्पद तरतुदी आहेत. कारण नसताना वाघाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचं काम या सरकारने केले आहे. या लढाईत सुप्रीम कोर्टापर्यंत जायचं झालं तरी न्यायालयीन सर्व खर्च करु.
अनिकेत दहिवाळ म्हणाले की, पुणे हे क्रांतीचे शहर आहे. त्यामुळे तुमचा पुणेकरांना त्रास नाही तर आधार आहे. त्यामुळे चुकीचा संदेश देण्याचा कुणी प्रयत्न करू नये. माजी खासदार जयदेव गायकवाड म्हणाले की, देशात जंतर मंतर आणि एस. एम. जोशी पूल हे दोनच ठिकाण सर्वाधिक चर्चेत आहेत. नामदेवराव जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच जागेत विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. ऋषिकेश गांगर्डे म्हणाला की, आता भीमनवार यांनी राजीनामा दिला पाहिजे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आजीच्या निधनाची बातमी दिपकेंना पोलिसांनी सांगितली, मूळ गावाकडे रवाना झाले आई-वडील
पुढील बातमी
ऐतिहासिक वासोटा किल्ला दि. १५ ऑक्टोंबरपासून पर्यटनासाठी खुला; पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार

संबंधित बातम्या