फलटण तालुक्यात बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावास

by Team Satara Today | published on : 10 October 2026


फलटण : बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी महिला अंजला शारदाद खातून ऊर्फ सलमा अक्तारसदान ऊर्फ सलमा हाजीर शेख (वय ३३) हिला फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
दि. ८ मे २०२५ रोजी फलटण तालुक्यातील भिलकटी गावच्या हद्दीतील १८ फाटा परिसरात हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण केला.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध सबळ पुरावे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता ॲड. बांदल यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पोलीस कर्मचारी अमोल देशमुख व महिला पोलीस हवालदार वैशाली नेवसे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण तालुक्यात महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुढील बातमी
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील दुचाकी अपघातात सासू ठार, जावई जखमी; डंपरची दुचाकीला धडक

संबंधित बातम्या