सातारा : क्लासला जाणार्या युवतीला रस्त्यात अडवून तिची छेड काढणे आणि दुचाकीवरून पाठलाग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवेक सुहास साळुंखे आणि अजय शंकर भांडे (दोघेही रा. गोडोली) अशी संशयितांची नावे आहेत.
युवतीचा पाठलाग आणि अश्लील टिपण्यांबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून संशयितांनी तिच्या वडिलांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.
युवतीची छेड काढून तिच्या पित्याला मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा