शेतात जाणारा रस्ता अडवून दमदाटी केल्याप्रकरणी कामथीतील तिघांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 October 2026


सातारा : कामथी (ता. सातारा) येथे शेतात जाणारा रस्ता अडवून दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय चंदर चव्हाण, सुनीता संजय चव्हाण आणि अक्षय संजय चव्हाण (सर्व रा. कामथी) अशी संशयितांची नावे आहेत. संदीप लक्ष्मण चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली असून महिला कर्मचारी कुंभार तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझार परिसरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
युवतीची छेड काढून तिच्या पित्याला मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या