सदरबझार परिसरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 October 2026


सातारा : तरुणास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार परिसरातून कामावर जात असताना गौतम जयवंत कांबळे (वय 35, रा. भीमाबाई आंबेडकरनगर) यांना अडवून जुन्या वादातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कांबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुधाकर कांबळे (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. लक्ष्मीटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला कर्मचारी पोतेकर तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चिंचणीत घरफोडी; सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास
पुढील बातमी
शेतात जाणारा रस्ता अडवून दमदाटी केल्याप्रकरणी कामथीतील तिघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या