महाबळेश्‍वरमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करताना तिघे ताब्यात; महाबळेश्‍वर पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : कत्तलीसाठी जनावरे खरेदी करून त्यांची विनापावती वाहतूक करताना तसेच जनावरांना काठीने मारहाण करून निर्दयीपणे ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाबळेश्‍वर पोलिसांनी तिघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी कतलीच्या उद्देशाने मेढा-कुसुंबी येथून जनावरे खरेदी केली होती. त्यानंतर ही जनावरे आरोपींच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, जनावरांची विनापावती खरेदी करण्यात आली असून पशुवैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. तसेच त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना ओढत नेण्यात येत होते. एवढेच नव्हे तर जनावरांना काठीने मारहाण करून निर्दयीपणे कतलीसाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अनिल रामचंद्र लांघी (वय 31, रा. क्षेत्र महाबळेश्‍वर) यांनी महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीच्या आधारे निलेश नारायण बाबर (वय 34, रा. वेळे-कामथी, ता. जावली), तुकाराम शंकर सुतार (वय 64, रा. कुसुंबी, ता. जावली) आणि सय्यद मुबारक वारूनकर (वय 38, रा. रांजणवाडी, ता. महाबळेश्‍वर) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक परजणे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बाजारातील बागवान गल्ली परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
पुढील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

संबंधित बातम्या