जुन्या भांडणातून धारदार शस्त्र घेवून शाहूपुरी येथील तरुणासह आईला दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून हातात लांब धारदार कोयता घेऊन मोटारसायकलवरून घरात घुसत तरुणाला धमकावल्याची धक्कादायक घटना शाहूपुरीत घडली. कोयता उगारून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी केंद्रासमोर, शाहूपुरी येथील फिर्यादीच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.
फिर्यादी आकाश बाळकृष्ण मेखले (वय 22, व्यवसाय मंडप डेकोरेशन, रा. आकाशवाणी केंद्रासमोर, शाहूपुरी, सातारा) हे घरी असताना आरोपी अमर अशोक चव्हाण (रा. गेंडामाळ कब्रस्तानासमोर, शाहूपुरी, सातारा) हा  मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने हातातील मोठा लांब धारदार कोयता फिर्यादीच्या दिशेने उगारुन फिर्यादीला तसेच त्याच्या आईला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घरातच धारदार कोयता घेऊन धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेप्रकरणी आकाश मेखले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकासनगर येथील व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सदर बाजारातील बागवान गल्ली परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई

संबंधित बातम्या