सातारा : ई-मेल व इन्स्टाग्रामवरून वारंवार बदनामीकारक मेसेज, शिवीगाळ आणि धमकीचे संदेश पाठविल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर परिसरात राहणार्या 18 वर्षीय तरुणीला आरोपी अंकुश महेश राय (रा. एच. एन. 6065 ए, खर्शीपुरा, झाशी, उत्तर प्रदेश) याने वेळोवेळी ई-मेलद्वारे बदनामीकारक, शिवीगाळ करणारे व धमकीचे संदेश पाठविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच इन्स्टाग्रामवरूनही मेसेज करून त्रास दिल्याचा आरोप आहे.
याशिवाय ब्लिंकइटच्या माध्यमातून अश्लील मजकूर लिहिलेले पार्सल पाठवून आपल्या मनास लज्जा उत्पन्न केली आणि बदनामी केली, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार 1 मार्च ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून अंकुश महेश राय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.
बदनामीकारक मेसेज, धमकीचे संदेश पाठवून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका परप्रांतीयावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा