कोरेगावच्या घरफोडीचा एलसीबीने लावला छडा; ४ तोळे सोन्याच्या दागिन्यासह ५.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तुषार सुतार ताब्यात

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा  : कोरेगाव तालुक्यातील महादेवनगर येथे झालेल्या घरफोडी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छडा लावला आहे. या गुन्ह्यातील संशयित तुषार प्रमोद सुतार (वय ३१, रा. महादेवनगर, कोरेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे चार तोळे वजनाचा सोन्याचा दागिना आणि इतर असा एकूण सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेवनगर येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबरदरम्यान घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या.
त्यानुसार निरीक्षक घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार केले होते. दरम्यान, खास बातमीदारामार्फत महादेवनगर येथील घरफोडी सुतार याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने शोध घेतला असता तुषार सुतार हा सातारा शहरात मिळून आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला सुमारे चार तोळे वजनाचा सोन्याचा दागिना हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके आणि कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि श्री. चंद्रकांत पुजारी, पो.उ.नि श्री. अतुल जगदाळे, तसेच पोलीस अंमलदार इसाक मुलाणी, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अमीत माने, शिवाजी भिसे, अरूण पाटील, शकुंतला सणस, तसेच कोरेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके यांनी सहभाग घेतला आहे. सदर केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तसेच एलसीबी व कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्थेसाठी 'शांतता, शिस्त व सुरक्षितते'ची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन; सातारा तालुका पोलिसांकडून मंडळे व ग्रामप्रमुखांची बैठक
पुढील बातमी
दाम्पत्याला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या