विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : सातारा तालुक्यातील 39 वर्षीय विवाहिता घरातून बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांकडून नातेवाईक व परिचितांकडे शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
ही महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. बराच शोध घेऊनही त्या आढळून न आल्याने महिलेच्या पतीने पोलिसांकडे धाव घेतली. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सहायक फौजदार सी. बी. माने तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीत दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार जखमी, वाहनचालकावर गुन्हा
पुढील बातमी
मल्हारपेठ परिसरात जुगार अड्ड्यावर धाड; रोकडसह साहित्य जप्त, सातारा शहर पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या