मित्राची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलास मारहाण; शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : मित्राची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलास मारहाण करून त्याचा छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरताज शेख, सोहेल इस्माईल सय्यद आणि अल्तमश कागदी (सर्व रा. शाही मशीद परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. उपनिरीक्षक गोवेकर पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे लाखोंची मागणी; तिघांकडून पट्ट्याने मारहाण
पुढील बातमी
गोडोलीत दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार जखमी, वाहनचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या