कोरेगाव नगर पंचायत, आरोग्य विभागातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 06 October 2026


सातारा  :  नगर पंचायत कोरेगाव, आरोग्य विभाग आणि तालुका कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत  नागरिकांसाठी   मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे नागरिकांची रक्तदाब , मधुमेह, नेत्र तपासणी, ईसीजी तसेच सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
 या कार्यक्रमास नगर पंचायतीचे पदाधिकारी, तालुका कार्यालयातील अधिकारी, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व नगर पंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रहिमतपूर-वडूज मार्गावरील वाहतुकीत बदल; 31 मे 2027 पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे आवाहन
पुढील बातमी
महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती; विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन

संबंधित बातम्या