सातारा : आज मध्यरात्रीपासून रहिमतपूर-वडूज मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे 31 मे 2027 पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्या रहिमतपूर-अंभेरी-वडूज-मायणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 38 चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिमतपूर शहरातील आदर्श शाळेला लागून असलेल्या ओढ्यावरील जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन चौपदरी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
पावसाळी हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ओढ्याला वारंवार आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पुलाचे काम नियोजित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याची नवीन अधिसूचना जारी केली आहे. 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून ते 31 मे 2027 रोजी मध्यरात्रीपर्यंत रहिमतपूर ते मायणी प्रमुख जिल्हा महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. या नव्या अधिसूचनेनुसार, रहिमतपूर ते वडूज जाणारा रस्ता सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते आदर्श शाळा रहिमतपूरपर्यंतचा मुख्य रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नवीन वाहतूक व्यवस्थेनुसार, रहिमतपूर तसेच कोरेगाव येथून वडूजच्या दिशेने जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना रहिमतपूर, साप फाटा, साप गाव, अपशिंगे फाटा आणि अंभेरी मार्गे वडूजकडे वळवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडूजकडून रहिमतपूर आणि कोरेगावच्या दिशेने येणार्या वाहनांना वडूज, अंभेरी, अपशिंगे फाटा, साप फाटा आणि साप गाव मार्गे रहिमतपूर व कोरेगावच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूक मार्ग वळवण्यात आले आहेत, त्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरी या वाहतूक मार्गातील बदलांची सर्व नागरिक व वाहनचा
रहिमतपूर-वडूज मार्गावरील वाहतुकीत बदल; 31 मे 2027 पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा