सातारा : एकाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी दिग्विजय दिनकर थोरात (रा. नडशी, ता. कराड) यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश जयसिंग शिंदे, गणेश संतोष हादगे, बंटी उर्फ तेजस दिनेश साळुंखे, सनी उर्फ निलेश रमेश नलवडे, गणेश नलवडे (सर्व रा. नागठाणे, ता. सातारा), जय पवार, तारळे येथील गुरांचा डॉक्टर महेश आणि दोन महिला यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिता मधील तेजस दिनेश साळुंखे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील करीत आहेत.
एकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नागठाणे येथील नऊ जणांवर गुन्हा; एकजणास अटक
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा