सातारा : न्हाळेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देऊनही आवश्यक ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार असून त्यातील रिल स्टार अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून घरी घालवा अशी मागणी दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण केली आहे.
न्हाळेवाडीसह परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दीड म्हण्यापूर्वीच नागरिकांनी लेखी कळवले होते. यात रिल स्टार अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले असल्याने सदर बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. त्यातच एकीकडे महावितरण कंपनी हि स्मार्ट मीटर बसवण्याचा गाजावाजा करत असून वारंवार लाईट कशी जाते. त्यामुळे या विभागाचेही अधिकारी यास जबाबदार धरावेत. तसेच वनविभागाने तातडीची मदत म्हणून १० लाख रुपये देत संबंधित कुटुंबाची बोळवण करू नये. सोमवारी तात्काळ राहिलेले तात्काळ रक्कम अदा करावी अन्यथा दोन्ही कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना काळे फसले जाईल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
वनविभागाच्या रिल स्टार अधिकाऱ्याला घरी घालवा; दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मागणी
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा