जिल्हा बँक निवडणुकीतील नामनिर्देशन पत्रांची उद्या छाननी; उमेदवार किंवा अधिकृत सूचकांनाच प्रवेश; हरकतींसाठी पुरावे अनिवार्य

by Team Satara Today | published on : 04 October 2026


सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बँकेच्या सभागृहात होणार आहे.
छाननीच्या वेळी संबंधित उमेदवार स्वतः उपस्थित राहू शकतील. उमेदवाराला स्वतः उपस्थित राहणे शक्य नसल्यास, त्याने आपल्या वतीने सूचकाला लेखी प्राधिकृत करणे आवश्यक आहे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवार किंवा अधिकृत सूचकाने सोबत फोटो ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी मतदारसंघनिहाय करण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघाची छाननी सुरू असेल, त्यावेळी केवळ त्या मतदारसंघातील संबंधित उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत सूचक यांनाच सभागृहात उपस्थित राहता येणार आहे.
दरम्यान, दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांबाबत कोणाला हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात आणि संबंधित पुराव्यांसह सादर करावी लागणार आहे. केवळ तोंडी किंवा पुराव्याशिवाय केलेल्या हरकतींची दखल घेतली जाणार नसून, पुराव्यानिशी प्राप्त झालेल्या हरकतींवर नियमानुसार निर्णय घेण्यात येईल.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी संबंधित उमेदवार व त्यांच्या सूचकांनी छाननीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जय गेला.. आता तरी बिबट्याला पकडा; न्हाळेवाडीतील चिमुकल्याच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; तीन गावांचे ग्रामस्थ जलमंदिरवर धडकले, वनविभागाला थेट जाब
पुढील बातमी
कौटुंबिक वाद विकोपाला; वडिलांच्या बॅटच्या प्रहारात अल्पवयीन मुलीचा मृत्यू, गोडोलीतील धक्कादायक घटना

संबंधित बातम्या