सातारा जिल्हा क्रीडा संकुलात तरुणाचा धुडगूस; डोक्यात वीट मारल्याने तरुण जखमी

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : सातारा जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी सकाळी एका तरुणाने धुडगूस घालत अनेकांशी हुज्जत घातली. दोन ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षकांशी वाद घातल्यानंतर त्याने पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या एका तरुणाशीही वाद घातला. रागाच्या भरात त्याच्या डोक्यात वीट मारल्याने तो तरुण जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित तरुण सकाळी साडेसहाच्या सुमारास क्रीडा संकुलातील जीममध्ये आला होता. तेथेही त्याने काही व्यक्ती व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यानंतर स्विमिंगसाठी आलेल्या काही व्यक्तींशी वाद घालत क्रीडा संकुलात आलेल्या पोलीस भरतीच्या सरावासाठी आलेल्या युवकासोबत वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले आणि त्याने वीट डोक्यात मारल्याने संबंधित युवक जखमी झाला. या प्रकारामुळे क्रीडा संकुलात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला तेथून नेहले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात कामगारांमध्ये झालेल्या वादाची माहिती विचारण्याच्या बहाण्याने सहा जणांचा सुरक्षारक्षकावर हल्ला
पुढील बातमी
दलित महासंघाच्या संघटना बांधणीसाठी मंगळवारी साताऱ्यात बैठकीचे आयोजन; उमेश चव्हाण व सूर्यकांत काळे यांची माहिती

संबंधित बातम्या