सातारा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून ओगलेवाडी येथील एकजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ओगलेवाडी येथील प्रशांत दीपक उमराणी (वय ४२) हे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेऊनही ते सापडले नसल्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
उमराणी हे जिल्हा रुग्णालय परिसरातून बेपत्ता झाले. त्यांचा नातेवाइकांनी विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला असून त्यांच्या हालचालींबाबत माहिती घेतली जात आहे. महिला पोलिस कर्मचारी पवार तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढेफाटा ते एमआयडीसी परिसरात जुगाराच्या दोन कारवायांत रोकड अन् जुगार साहित्य जप्त
पुढील बातमी
मंगळवार पेठेत दोन गट आमनेसामने; दगडफेक, दांडक्याने मारहाण आणि धमकी, परस्परविरोधी गुन्हे

संबंधित बातम्या