वाढेफाटा ते एमआयडीसी परिसरात जुगाराच्या दोन कारवायांत रोकड अन् जुगार साहित्य जप्त

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : शहर परिसरातील जुगाराच्या अड्ड्यांवर सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. वाढेफाटा आणि एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
वाढेफाटा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत आशिष अशोक नवले (रा. सैदापूर, ता. सातारा) आणि समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सात हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.
यानंतर पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने एमआयडीसी परिसरात कारवाई केली. तेथे जुगारप्रकरणी अमित रामचंद्र कदम (रा. कुर्डुवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक हजार २०० रुपये रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही कारवायांप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; तब्बल 12 लाख 80 हजारांचे हरविलेले एकूण 71 मोबाईल शोधून मूळ मालकांना दिले परत
पुढील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून ओगलेवाडी येथील एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या