सातारा पोलीस दलातील कॉन्स्टेबलची पोलादपूरमध्ये आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात होते कार्यरत; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : सातारा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे सातारा पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष ननावरे हे सध्या भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथकही पोलादपूर येथे दाखल झाले. ननावरे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले की अन्य काही कारण होते, याचा तपास सुरू आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित त्रासाच्या शक्यतेचाही तपासाच्या अनुषंगाने विचार केला जात आहे.
३६ वर्षीय पोलीस अंमलदाराच्या अशा अकाली मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आखाड्यातील घामातून आंतरराष्ट्रीय मल्ल घडावेत
पुढील बातमी
शशिकांत शिंदेंच्या दोन अर्जांनी जिल्हा बँकेतील राजकीय गणिताला धक्का

संबंधित बातम्या