सातारा : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा सातारा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजीव कुमार यांनी खंडाळा येथील तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते भटके विमुक्त प्रवर्गातील १५ गरजू नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
विविध योजना आणि सेवांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने पोहोचावा, यासाठी सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित अर्जांचा निपटारा करून नागरिकांना आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे गतीने उपलब्ध करून दिली जात आहेत.
या कार्यक्रमा प्रसंगी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे भटक्या-विमुक्त समाजातील १५ लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा तालुक्यासह शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचे अपहरण
September 30, 2026
एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
September 30, 2026