एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी अन्य महिलेसह तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात राहणाऱ्या एका महिलेस चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केल्याप्रकरणी अन्य महिलेसह शुभम सतीश डोंगरे आणि शुभम काळे (दोघेही रा. पुणे) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला वेग; ७४ अर्ज दाखल; शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता
पुढील बातमी
सातारा तालुक्यासह शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचे अपहरण

संबंधित बातम्या