९ ऑक्टोबरपासून वडूज, दहिवडी, फलटण मार्गावर विना वाहक विना थांबा बसेस - विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांची माहिती

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्यावतीने वडूज, पुसेगाव, दहिवडी व फलटण मार्गावर विना वाहक विना थांबा बसेस दि. ९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती  विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली.
सध्या सुरू असलेल्या सर्व शटल फेऱ्या ठेवून वडूज-पुसेगाव-सातारा, दहिवडी-पुसेगाव-सातारा व फलटण-सातारा मार्गावर विनाथांबा विना वाहक फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. वडूज-सातारा मार्गावर सकाळी ७ वाजता, ८ वाजता, ९ वाजता, ११ वाजता, १२ वाजता व १ वाजता तर सातारा-वडूज मार्गावर सकाळी ९ वाजता, १० वाजता, ११ वाजता, १ वाजता, २ वाजता ३ वाजता सुटणार आहेत. दहिवडी-सातारा मार्गावर सकाळी ६.३०, ७.३०, ८.३०,१०.४०, ११.४० व १२.४० वाजता तर सातारा- दहिवडी मार्गावर सकाळी ८.४०,९.४०, १०.४०, १२.४०,१.४०, २.४० वाजता सुटणार आहेत. वडूज-सातारा व दहिवडी -सातारा या फेऱ्यांना पुसेगाव येथे जाता येता थांबा दिला आहे.
फलटण- सातारा मार्गावर सकाळी ७ वाजता ८ वाजता. ९, ११.२० वाजता, १२.२० वाजता, १.२० वाजता तर सातारा-फलटण मार्गावर सकाळी ९.३० वाजता, १०.३० वाजता, ११.३० वाजता, १.३० वाजता, २.३० वाजता, ३.३० वाजता बसेस सुटणार आहेत. प्रवाशांनी या विना थांबा , विना वाहक फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; चांदोली-सह्याद्री प्रकल्पग्रस्तांचा हेळवाक येथे 'रास्ता रोको', वन कार्यालयांना ठोकले टाळे
पुढील बातमी
पशुपालकांसाठी दिलासा; महाराष्ट्र वैरण विकास धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; चाऱ्याची उपलब्धता वाढणार

संबंधित बातम्या