सातारा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा आणि प्रमाणपत्रांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी मौजे सडावाघापूर (ता. पाटण) येथे सेवा संकल्प अभियान व भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्रांचे जागीच वाटप करण्यात आले. यामध्ये ५८ डोमासाईल प्रमाणपत्रे, १४ जातीचे दाखले, ७ वारस फेरफार, २३ सातबारा उतारे, ४८ रेशनिंग कार्ड, ८ आभा कार्ड, ७ मृत्यू प्रमाणपत्रे आणि ९ घराचे उतारे अशा अनेक महत्त्वपूर्ण शासकीय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या या उपक्रमामुळे एकाच छताखाली विविध दाखले मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महसूल विभाग, आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्प विभाग आणि पशुसंवर्धन विभाग या प्रमुख शासकीय विभागांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.
सडावाघापूर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध महत्त्वपूर्ण शासकीय दाखल्यांचे वाटप
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा