सातारा : बुधवार नाका चौकातील नगरपालिका शाळेसमोर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवतेज उमेश मोरे (वय 28, रा. दुदुस्करवाडी, ता. जावली, जि. सातारा, सध्या रा. नगर करंजे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा चुलत भाऊ मोहित तानाजी मोरे (वय 36) हे बुधवार नाका चौकातील नगरपालिका शाळेसमोरून दुचाकीवरून जात असताना अज्ञात डंपर चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोहित मोरे यांच्या डोक्याला, कंबरेला व हाताला दुखापत झाली.
याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
बुधवार नाका चौकात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; डंपर चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा