सातारा : हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. विवो पुणे यांच्या सीएसआर निधी अंतर्गत ऊर्मी संस्था पुणे यांचेमार्फत यशोधन ट्रस्ट, ता. वाई, जि. सातारा यांना नुकतेच रेशन किट पुरवण्यात आले.
हिसोआ इलेक्ट्रॉनिक यांच्या संकल्प 2.0 या उपक्रमांतर्गत उमरगा,वाई आणि तळेगाव येथील अनाथाश्रमांना अन्नधान्य मदत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची संपूर्ण आखणी रोहित वाकळे - सीएसआर समन्वयक, हिसोआ इलेक्ट्रॉनिक यांनी केली असून ऊर्मी संस्था समन्वयक राहुल चुनीदास अंमलबजावणी करत आहेत.
रेशन किट वाटप प्रसंगी हिसोआ इलेक्ट्रॉनिक कंपनीचे एचआर व्यवस्थापक सौम्य बक्षी व फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण तसेच उमरगा परिसरातील विवो मोबाईलचे विविध विक्रेते, विक्री प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.
पुण्याच्या हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो कंपनीच्या सीएसआर निधीतून ऊर्मी संस्थेची यशोधन ट्रस्टला मदत
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा