सुरूर येथे गणपती विसर्जनावेळी विहिरीत पडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; गावावर शोककळा

by Team Satara Today | published on : 28 September 2026


भुईंज : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा सुरूर, (ता. वाई) येथे विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य संतोष चव्हाण असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.
आदित्य हा वाई येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तो वडील व चुलत्यांसमवेत गणपती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन करून विहिरीतून बाहेर येत असताना त्‍याचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि तो खोल विहिरीत कोसळला.
यानंतर वडील व चुलत्यांनी प्रसंगावधान राखत आदित्यला वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर खोल असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नाही. घटनेची माहिती मिळताच सुरूरमधील तरुणांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीत शोधमोहीम सुरू केली. पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर आदित्यला विहिरीबाहेर काढले. यानंतर जिल्‍हा रुग्‍णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरमधील मराठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात अंधश्रद्धेशी संबंधित वस्तू; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
पुढील बातमी
वडूजमध्ये आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; दारूच्या नशेत धाकट्या भावाचा खून, थोरला भाऊ पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या