सातारा : सातारा शहरात गणेशोत्सवावेळी दोन गटात जोरदार राडा होवून हाणामारी झाली. मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात मारहाणीसह, विनयभंगाच्या सुमारे 21 जणांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 सप्टेबर रोजी ही घटना घडली आहे. एका तक्रारीत तक्रारदार महिलेने असे म्हटले आहे की, त्या व त्यांच्या नातेवाईक महिला दुचाकीवरुन जात असताना काही जणांनी त्यांना अडवले. अश्लील शेरेबाजी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. संशयित विनयभंग करत असताना बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर महिलांचे नातेवाईक तेथे आले. यावेळी संशयितांनी नातेवाईकांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली.
दुसर्या तक्रारीत तक्रारदाराने असे म्हटले आहे की, त्यांच्या पुतण्याला व नातेवाईकाला दि. 25 सप्टेबर रोजी काहीही कारण नसताना संशयितांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पोलिसांसह इतर नागरिकांनी हा वाद सोडवला. पुतण्या व नातेवाईक घरी आले. दि. 26 सप्टेबर रोजी पुन्हा संशयित जमावाने आले व त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच कुटुंबातील महिलांचा विनयभंग केला, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
साताऱ्यात गणेशोत्सवावेळी दोन गटात जोरदार राडा; 21 जणांवर परस्परविरोधी तक्रारी;
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा