हिंदी असंख्य मनांचा संवाद घडवणारी भाषा, प्रत्येक भाषेचा सन्मान व्हावा - चंद्रकांत देवरुखकर; सातारा येथे हिंदी दिवसानिमित्त काव्य संमेलन उत्साहात

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : आपल्या वैविध्यतेने नटलेल्या देशामध्ये राज्यनिहाय भाषा वेगवेगळ्या असल्या तरी हिंदी भाषा ही समाज एकसंध ठेवण्याचे चांगले माध्यम आहे. प्रादेशिक विभागानुसार बदलणाऱ्या भाषांमध्ये हिंदी ही असंख्य मनांचा संवाद घडवणारी भाषा आहे. आपापल्या मातृभाषेच्या सन्मानाबरोबर प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे तरच देशाची एकता टिकून राहील, असे मत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देवरुखकर यांनी व्यक्त केले.
सातारा रेल्वे स्थानकात राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने हिंदी दिवसानिमित्त रेल्वे स्टेशन गार्डन येथे आयोजित काव्य संमेलन, व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक राहूल किर्तीकर यांच्यासह राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सर्वश्री राजकुमार साळवे, राजेश मानकर, गणपत चव्हाण, अजय मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.
या काव्य संमेलनात सर्वश्री. रविकांत, कुमार घुमल, गायत्री स्वप्नील झकार्डे, दिपश्री यादव, राहुल रंजन, राजकुमार साळवे आणि राजेश मानकर या कवींनी सहभाग घेत विविध विषयांवरील कविता सादर केल्या. कवींच्या बहारदार काव्यवाचनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्याम ढोके यांनी केले. हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासोबतच साहित्यिक व सांस्कृतिक वातावरण निर्मिती करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; पोलिसांत गेल्यास कुटुंब संपविण्याची धमकी
पुढील बातमी
वडजल-म्हसवड मार्गावर तीन कारची धडक; भीषण अपघातात पलूसच्या एकाचा मृत्यू, नऊ जखमी

संबंधित बातम्या