रांगेत घुसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मर्ढेत कुटुंबावर लाठी-दांडक्याने हल्ला

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : गणेश दर्शनासाठी लावलेल्या रांगेत घुसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. मर्ढे येथे घडलेल्या या प्रकारात तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करण्यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष बाबुराव येवले (वय 32, रा. झरेवाडी, ता. वाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम शिंगटे, अथर्व शिंगटे, विकी भोसले, संकेत भोसले, अनिल मधुकर शिंगटे आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 25 रोजी येवले कुटुंबीयांसह मर्ढे येथील मोरया प्रतिष्ठान मंडळात दर्शनासाठी गेले होते. रांगेत एकजण घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने येवले यांनी विरोध केला. त्यावरून संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुन्या वादातून क्षेत्रमाहुलीत तरुणाच्या पाठीवर कोयत्याचा वार; अक्षय आढाव याच्याविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; पोलिसांत गेल्यास कुटुंब संपविण्याची धमकी

संबंधित बातम्या