सातारा : दारू पिऊन दुश्मनासोबत का फिरतोस, असा जाब विचारत मित्रानेच तरुणाच्या गालावर कोयत्याने वार केल्याची घटना तांदूळआळी येथील वाईन शॉपसमोर घडली. याप्रकरणी सुरेश यमनाप्पा नलवडे याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत उर्फ विशाल दशरथ विटकर (वय 26, रा. केसरकर पेठ) यांनी फिर्याद दिली. दि. 24 रोजी वाईन शॉपसमोर विटकर असताना त्यांचा मित्र नलवडे तेथे आला. दारू पिऊन दुश्मनासोबत का फिरतोस?’ असे म्हणत त्याने विटकर यांच्याशी वाद घातला.
वाद वाढल्यानंतर नलवडे याने कोयता काढून विटकर यांच्या डाव्या गालावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यात विटकर जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार राजगे तपास करीत आहेत.
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा