एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : पूर्वी दिलेले एक लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुकानदाराने तिघांना मारहाण केल्याची घटना विसावा नाका परिसरात घडली. लोखंडी स्टूलने मारहाण केल्याचा आरोप असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
किरण सुधाकर कुलकर्णी (वय 45, रा. शाहूनगर, गोडोली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अभिजीत सुरेश रावण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 23 रोजी दुपारी येस मार्केटिंग’ दुकानात हा प्रकार घडला. कुलकर्णी यांनी पूर्वी श्रीराम चिट्स इंडिया कंपनीत काम करताना रावण याला दिलेले एक लाख रुपये परत मागितले. रावण याने पैसे देण्यास नकार देत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर कुलकर्णी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी स्टूलने मारण्यात आले. भांडण सोडविण्यास आलेल्या सचिन धादमे व अमोल डोईफोडे यांनाही मारहाण केल्याचे नमूद आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात १६३८ श्रीसदस्यांकडून ६ टन ६३३ किलो निर्माल्य संकलन; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानकडू्न मूर्ती विसर्जनावेळी उपक्रम
पुढील बातमी
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला

संबंधित बातम्या