सातारा : समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण स्वच्छतादूत डॉ.श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी,रायगडभुषण डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी गणेशोत्सवकाळातील निर्माल्य संकलन व कंपोस्ट खतनिर्मितीचा पर्यावरणपुरक उपक्रम जिल्हाभरात सर्वत्र राबविण्यात झाला. जिल्ह्यात १६३८ श्रीसदस्यांकडून ६ टन ६३३ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले असू्न त्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
संगम माहुली, बुधवार नाका कृत्रिम तळे (सातारा), महागणपती घाट (वाई), कृष्णा घाट (भुईंज),प्रितीसंगम घाट (कराड), पाचवड फाटा (धोंडेवाडी), येरळा नदी (वडुज), येरळा नदी (पुसेगाव), कोयना नदी मुळगाव पुल (पाटण), निसरे पूल (मारूलहवेली ) या दहा ठिकाणी राबविलेल्या पर्यावरणपुरक उपक्रमात १६३८ सदस्यांनी ६६३३ किलोग्रॅम निर्माल्य संकलन करून शनिवारी प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपणठिकाणी खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात केली.
पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, सभापती महेश गाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, श्री सेवागिरी देवस्थान पुसेगाव मठाधिपती प.पु.सुंदरगिरी महाराज, सारंग पाटील आदींनी या उपक्रमावेळी हजेरी लावून कार्याचे कौतुक केले.
प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात पंधरा-वीस ठिकाणी आत्तापर्यंत वृक्षारोपण केले आहे. हजारो झाडे जगविण्यात आली असुन संकलित निर्माल्यापासुन तयार कंपोस्ट खत वृक्षांना घालण्यात आले आहे. निर्माल्य संकलन व खतनिर्मिती उपक्रमात गणेशभक्तांकडून निर्माल्य संकलन केल्यामुळे नदी,तलाव,बंधारा,घाट येथील होणारे जलप्रदुषण थांबविण्यासाठी प्रशासनावरील बराचसा ताण कमी होण्यास मदत झाली.नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. संकलित निर्माल्य प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपन केलेल्या ५ ठिकाणी खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरूवात केली.
जिल्ह्यात १६३८ श्रीसदस्यांकडून ६ टन ६३३ किलो निर्माल्य संकलन; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडू्न मूर्ती विसर्जनावेळी उपक्रम
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा