सातारा : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ जाहीर झाली असून, या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर २०२६ आहे.
पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करता येणार असून, त्यासाठी "महा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर" (https://mahaelection.gov.in/citizen/login) जाऊन अर्ज करता येईल. तसेच, ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्यांची कार्यालये २६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू राहणार असून, या कार्यालयांमध्ये मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी पात्र असलेल्या सर्व शिक्षक व पदवीधर मतदारांनी २६ सप्टेंबर २०२६ पूर्वी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६; पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर
by Team Satara Today | published on : 25 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा