सातारा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेनुसार प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी), पदवी (बी. फार्मसी), आणि पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी) अभ्यासक्रमांच्या २०२६-२७ संस्था स्तरावर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे: बी. फार्मसी आणि एम. फार्मसी: २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.डी. फार्मसी: २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.
रिक्त जागांचा सविस्तर तपशील, आवश्यक पात्रता, निकष, नियम आणि संपूर्ण वेळापत्रक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या आधिकृत संकेतस्थळावर (www.gcopk.ac.in) प्रसिद्ध केले जाईल.
अतिरिक्त प्रवेश फेरी पूर्ण होईपर्यंत आधी झालेले प्रवेश रद्द झाल्यास रिक्त जागांच्या संख्येत बदल होऊ शकतो, असेही शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यलयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
कराड शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी समुपदेशन फेरीचे आयोजन
by Team Satara Today | published on : 25 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा