सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्योतिबाची वाडीत फार्मर आयडी कॅम्प; शेतकऱ्यांना फार्मर आयडीबाबत मार्गदर्शन

by Team Satara Today | published on : 25 September 2026


सातारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्योतिबाची वाडी, ता. पाटण येथे गणेश मंडळ आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने फार्मर आयडी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून २५ खातेदारांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुलभ होण्यास मदत झाली.
गणेश मंडळ आणि महसूल विभागाच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या कॅम्पला खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भेटीला; ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती
पुढील बातमी
शेतातील गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

संबंधित बातम्या