सातारा : मुंबई उच्च न्यायालय व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशारितीने डॉल्बीचा वापर करणारे तसेच सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहनधारक यांना येण्या-जाण्यास अटकाव करणार्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करुन 2 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी उच्च न्यायालय मुंबई व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशा रितीने डॉल्बीचा वापर करणारे तसेच सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहनधारकांना येण्या-जाण्यास अटकाव करणार्या वाहन चालकांवर प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्याचे निर्देश सातारा जिल्हा पोलीस दलास दिलेले आहेत. त्याअनुशंगाने सातारा शहर पोलीस ठाणे व शाहुपूरी पोलीस ठाणे कडील प्रभारी पोलीस अधिकारी यांच्याकडून गणेश मंडळ, डॉल्बी मालक यांना कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याकरीता नोटीस देण्यात आलेली होती.
काल दि. 24 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे, निलेश तांबे पोलीस निरीक्षक सातारा तालूका पोलीस ठाणे, श्रीमती प्रियांका बाबर सहायक पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे सातारा शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत एकूण 12 व सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 3 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरणूकीमध्ये उच्च न्यायालय मुंबई व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशा रितीने डॉल्बीचा वापर करणार्या व्यक्ती, सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहन धारकांना येणे जाणेस अटकाव करणार्या वाहन चालक यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने शाहुपूरी पोलीस ठाण्यास 12 व सातारा शहर पोलीस ठाण्यास 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या डॉल्बी, व वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे, निलेश तांबे सातारा तालूका पोलीस ठाणे, श्रीमती प्रियांका बाबर सहा.पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर, सुधीर मोरे तसेच पोलीस अंमलदार शरद बेबले, अविनाश चव्हाण, रोहित निकम, किरण जगताप, अमोल साळूंखे, शुभम चव्हाण, राहुल गायकवाड, माधुरी शिंदे, सुप्रिया चव्हाण दत्ता पाटोळे, जगन्नाथ कदम, देशमुख, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, गणेश जाधव, सागर निकम, धीरज मोरे, पंकज मोहिते, निलेश जाधव, निलेश यादव, मच्छिंद्र माने, विक्रम माने, तुषार भोसले व गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत गणेश मंडळ व डॉल्बी मालक यांचेवर कारवाई केलेल्यांची नावे -
जय शिवराय मित्र मंडळ भैरवनाथ मंदिराजवळ करंजे.
1) केतन प्रविण वाघ, वय 29 वर्षे, रा.नांदगिरी ता.कोरेगाव जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) अनुज विलास फाळके, वय 25 वर्षे रा.सातारारोड पाडळी ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)
नवरत्न गणेशोत्सव मंडळ करंजे.
1) रविंद्र राजेंद्र जाधव, वय 32 वर्षे, रा.जुने खेड ता.वाळवा जि.सांगली (ट्रक चालक)
2) शुभम शहाजी बाकले, वय 27 वर्षे रा.जुळेवाडी ता.कराड जि.सातारा (डॉल्बी मालक)
अष्टविनायक गणेश मंडळ दौलतनगर सातारा.
1) जुनैद दाऊद शेख, वय 21 वर्षे, रा.कोंडवे ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) प्रमोद चंद्रकांत औंधकर, वय 2% वर्षे रा.कोंडवे ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
शाहुपूरी गणेश मंडळ शाहुपूरी चौक सातारा
1) जय अर्जुन इंगवले, वय 48 वर्षे, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (टेम्पो चालक)
2) प्रदिप नारायण देवरुखे वय 48 वर्षे, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ खेड सातारा
1) आदेश अरुण निकम, वय 25 वर्षे, रा.काळोशी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) अमित ज्ञानेश्वर पवार, वय 29 वर्षे, रा.सदरबझार सातारा (डॉल्बी मालक)
श्रियश गणेशोत्सव मंडळ केसरकरपेठ सातारा
1) सुरज मुगूटराव कदम, वय 30 वर्षे, रा.निमसोड, ता.खटाव, जि.सातारा (डॉल्बी व टेम्पो मालक)
सुयोग गणेशोत्सव मंडळ पायथा ग्रुप सातारा
1) विलास दादा शिर्के, वय 56 वर्षे, रा.म्हसवे ता.जि.सातारा ( टेम्पो चालक)
2) जिवन तुकाराम शिर्के, वय 34 वर्षे, रा.म्हसवे ता.जावली जि.सातारा (डॉल्बी मालक)
एकता गणेशोत्सव मंडळ करंजे सातारा
1) पियुष गौरव सावंत, वय 22 वर्षे, रा.शाहुपूरी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) साहिल राजेंद्र बर्गे, वय 22 वर्षे, रा.कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)
बालस्मृती गणेश मंडळ केसरकरपेठ सातारा .
1) विशाल राजेंद्र धनावडे, रा.जकातवाडी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) रजनीकांत चंद्रकांत नागे, वय 41 वर्षे, रा.84 मल्हारपेठ सातारा (डॉल्बी मालक)
संघर्ष मित्रमंडळ सदरबझार सातारा.
1) दिपक बाबर रा.करंजे सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) उमाकांत चंद्रकांत नागे, वय 39 वर्षे, रा.84 मल्हारपेठ सातारा (डॉल्बी मालक)
शिवनगर गणेशोत्सव मंडळ मोरे कॉलनी सातारा.
1) भरत प्रविण जाधव, वय 35 वर्षे, रा.सातारारोड ता.कोरेगाव जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) माणिक पोपट शिंदे, वय 46 वर्षे, रा.सातारारोड ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक )
शिवतेज गणेशोत्सव मंडळ बुधवारपेठ सातारा.
1) स्वप्नील सुर्यकांत देशमुख वय 30 वर्षे रा.समतापार्क सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) सुमित रमेश संकपाळ वय 30 वर्षे रा.नुने ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत गणेश मंडळ व डॉल्बी मालक यांचेवर कारवाई केलेल्यांची नावे -
बाल गणेश तरुण मंडळ रविवारपेठ सातारा
1) संदिप चंद्रकांत नलवडे, रा.पांढरवाडी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) शुभम ज्ञानदेव खरात, रा.वनवासवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ यादोगोपाळपेठ सातारा
1) परशुराम चंद्रम वलीकर, रा.वर्जेश्वरी मंदिराशेजारी मळवी खेड, सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) प्रतिक सुनिल माने, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ भोसलेमळा करंजे सातारा
1) नितीन यशवंत भोसले, रा.भोसलेमळा करंजे सातारा (ट्रॅक्टर चालक)
2) हिमेश रमेश जाधव, रा.आर्वी ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)
3) अविष्कार अमोल सुतार, रा.कोडोली सातारा (स्ट्रॅक्चर तयार करणारा)
आवाजाची मर्यादा ओलांडणार्या 15 साऊंड सिस्टिम जप्त; साताऱ्यात पोलिसांची धडक कारवाई; 2 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल
by Team Satara Today | published on : 25 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा