दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेल्या माजी सैनिकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 21 September 2026


सातारा  : दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक/त्यांच्या विधवा, ज्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडून दरमहा रुपये ११,०००/- (अकरा हजार फक्त) एवढे अनुदान पाठविले जाते, त्या सर्व लाभार्थ्यांनी माहे नोव्हेंबर २०२६ चे अनुदान घेतेवेळी हयातीचे दाखले आपल्या संबधित बँकेत भरून द्यावेत, म्हणजे संबधित बँका हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडे त्वरीत पाठवून देतील.
माहे नोव्हेंबर २०२६ अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर २०२६ नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याणक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन
पुढील बातमी
'कचरा टाकू नये'च्या पाटीखालीच कचर्‍याचा डोंगर! सातारा पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांकडूनच हरताळ; कारवाईचा धाक कुठे?

संबंधित बातम्या