सातारा : महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व सखी वन स्टॉप सेंटरच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली नागरी सहकारी बँक, कराड येथे 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महिला सक्षमीकरण केंद्राच्या प्रतिनिधी रोहिणी जाधव यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरण केंद्र आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. सेंटरच्या माध्यमातून हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या विविध मोफत सुविधा, जसे की मानसोपचार समुपदेशन, वैद्यकीय सेवा, तात्काळ पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, तसेच तात्पुरत्या निवासाची सोय यांबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत महिलांच्या मदतीसाठी उपलब्ध महिला हेल्पलाइन: १८, चाइल्ड हेल्पलाइन: १०९८, पोलीस हेल्पलाइन: ११२, सायबर क्राईम हेल्पलाइन: १९३० या टोल फ्री क्रमांकांची माहिती देण्यात आली. याशिवाय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, बालविवाह प्रतिबंध कायदा यांसारख्या विविध कायद्यांची व योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा