सातारा : सातारा जिल्ह्यात रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुम-महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील युवक-युवती, महाविद्यालय, उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील आवाहन यांनी केले आहे.
डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विद्यानगर, ता. कराड जि. सातारा, छत्रपती शाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेंद्रे ता.जि.सातारा , यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक वर्ये, ता.जि.सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस पुणे हायवे रोड, सातारा, शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर कराड, मुधोजी महाविद्यालय फलटण, छ. शिवाजी शिक्षण संस्था वडूज ता. खटाव , काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले ता.पाटण, अभयसिंहराजे भोसले इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्नीक शेंद्रे ता. जि. सातारा, कै. सौ. वत्सलादेवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटण, दादासाहेब मोकाशी प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजमाची ता. कराड, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सातारा (मास भवन) जुनी एमआयडीसी, सातारा, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, दर्पण कॉम्पुटर इन्स्टिट्युट, कोरेगाव, शहाजीराजे महाविद्यालय खटाव या ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी 17 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा