अजिंक्यतारा किल्ला परिसरात युवकाला मारहाण, जबरी चोरी प्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 September 2026


सातारा : अजिंक्यतारा किल्ला परिसरात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून दगडाने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल असा ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महेश गोंदकर (रा. प्रतापगंज पेठ) रात्री नऊच्या सुमारास किल्ला परिसरात फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या परिसरात चकरा मारल्या. गोंदकर फोनवर बोलत असताना एकाने पाठीवर हाताने मारले. त्यांनी मागे वळताच दुसर्‍याने डोळ्यावर दगड मारला. त्यानंतर दोघांनी मारहाण करून त्यांना खाली पाडले.
चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 12 हजार 300 रुपये आणि गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. पळून जाताना खाली पडलेला मोबाईलही घेऊन ते पसार झाले. दुचाकीचा क्रमांक झाकलेला असल्याने तो समजू शकला नाही. जखमी गोंदकर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे तपास करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
पाटणच्या नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल - पालकमंत्री शंभूराज देसाई, पाटण पंचायत समितीत विकास कामांचा घेतला आढावा

संबंधित बातम्या