साताऱ्यात शेटे चौक परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लंपास; शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 September 2026


सातारा : शहरातील वर्दळीच्या शेटे चौक परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. वाहन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मालकाने याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन विश्वास शिंदे (रा. निसर्ग कॉलनी, जरंडेश्वर नाका) यांनी त्यांची सुमारे 15 हजार रुपये किमतीची दुचाकी शेटे चौक परिसरात उभी केली होती. काम आटोपून ते वाहन घेण्यासाठी परतले असता दुचाकी जागेवर आढळली नाही. परिसरात तसेच आजूबाजूच्या ठिकाणी शोध घेऊनही वाहन मिळाले नाही. अखेर शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून चोरीच्या वाहनाचा शोध सुरू केला आहे. पोलीस कर्मचारी सपकाळ तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारकरांचा पाच दिवसांच्या गौरी-गणरायांना निरोप; गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन
पुढील बातमी
बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या